ताज्या घडामोडी

एस.टी.महामंडळाची छुप्पी दरवाढ

कार्यकारी संपादक-नागेशचव्हाण

एसटी ला कोण ओळखत नाही. महाराष्ट्राच्या जडणघडणीत एसटीचा मोलाचा वाटा आहे. विशेष करून ग्रामीण जनतेला एकवेळ अशी होती की त्यांचा सर्व दिवसभराचा कार्यकम हा एसटीच्या येण्याच्या व जाण्याच्यावेळेवर निर्धारीत राहत असे.. गरीब असो मध्यमवर्गीय असो की श्रीमत असो या सर्वाचा एसटीशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे संबध आलेला आहे किंवा एसटीतुन प्रवास केलेला आहे. आजही एसटीचे महत्व आजही पूर्वीप्रमाणेच आहे. जरी खाजगी प्रवाशी गाड्या आल्या, लोकांच्या स्वतांच्या वैयक्तिक गाड्या असल्या तरी एसटीने प्रवास करणा-याची संख्या आजही दखल घेण्या ऐवढी आहे.

असे असले तरी या आवश्यकतेचा फायदा मात्र एसटी महामंडळ घेत असुन प्रवाश्याकडून छुपी दरवाढ करून प्रवाशाना कळणार नाही अश्या पध्दतीने पध्दतशीरपणे आर्थिक भार टाकला जात आहे. दरवर्षी प्रमाणे एसटी महामंडळाच्या प्राधिकरणाने उन्हाळी हंगामाकरीता 30 टक्केपर्यत दरवाढ करण्यास व ही दरवाढ जुन अखेरपर्यत करण्यास एसटी महामंडळास परवानगी एप्रील 26 मध्ये दिली होती. त्यास अनुसरून एसटी महामंडळाने 15 एप्रील 26 ते 15 जुन 26 अश्या दोन महिन्याकरीता हंगामी 10 दरवाढ केली होती. नंतर 15 जून संपल्यानंतर परत 1 महिना म्हणजे 15 जूलै पर्यत ही हंगामी दरवाढ कायम केली होती. परंतु एसटी महामंडळाने 15 जूलै नंतर हि हंगामी दरवाढ मागे न घेता नवीन 15 टक्केची वाढ केली. ती पण रोतोरात ना एसटी कर्मच-यानासुध्दा यादरवाढी माहिती करण्यात आली नाही आणि ना सरकारतपर्फे याची माहिती अगोदर सार्वजनिक करण्यात आली किंवा प्रेस नोट काढण्यात आली. अर्थात फक्त 15 टक्के दरवाढ करावयाची असताना ती प्रत्यक्षात 25 टक्के दरवाढ केली असुन याकरीता हंगामी दरवाढ असा गोडस शब्द वापरला. जर एकदम 25 टक्के दरवाढ केली असती तर जनतेचा विरोध झाला असता. त्यामूळे सूरूवातीला 10 टक्के व नंतर 15 टक्के अशी दरवाढ करून जनतेच्या प्रवास खर्चात मोठया प्रमाणात वाढ केलेली असून हि छुपी दरवाढ कोणाच्या नजरेत आली नाही. कारण एसटीचा प्रवाशी हा संघटीत नाही. एसटी प्रवाश्याकरीता कार्य करणारी कोणतीही संघटना ना राज्य स्तरावर आहे ना जिल्हा स्तरावर आहे. गावात एसटी आली कि त्यात बसायचे व आपले निश्चित स्थानक आले ती उतरायचे व आपले पुढील काम करायचे एवढेचा एसटीचा संबध असतो. अशी एसटीची प्रवाशी संघटना नसल्यामूळे दरवाढ होवो किंवा कोणता त्रास होवे मूकाटयाने सहन करीत सरकारच्या किंवा एसटीच्या नावाने ओरडायचे ऐवढे काम प्रवाशी करतात. लोकप्रतिनिधीनासुध्दा एसटीचे काहीही सोयरेसुतक नाही. कारण ती त्याची हक्काची मत देणारी जागा नाही आणि त्यांना कधी एसटीत बसुन प्रवास करावा लागत असतो. फक्त एकच आमदार होते ज्यांनी आयुष्यभर फक्त एसटीनेंच प्रवास केला आता ते या जगात नाही. त्यामूळे एसटीच्या प्रवाश्याच्या काय समस्या आहेत किंवा होत असलेली किंवा केलेली दरवाढ कशी अन्याकारक आहे यावर त्यांना आवाज उटवायची गरज नाही.

एसटी नुकसानीत आहे म्हणून दरवाढ करत राहणे हा कितपत योग्य पर्यात आहे. सर्व खाजगी प्रवाशी गाड्या फायदयात चालत असताना एसटी का फायदयात चालू शकत नाही याचा विचार कोण करणार फक्त दरवाढ करून हा प्रश्न सुटून एसटी फायदयात जाईल का ? केंद्राच्या कॅग संस्थेप्रमाणे राज्यातील कॅश संस्था किंवा तस्तम संस्था याबाबत काय करीत आहे. ?

एसटीसुध्दा धुतल्या तादळासारखी स्वच्छ नाही. अनेक डेपो मध्ये स्थानिक पातळीवर मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार होत असतो. मोडकळीस आलेल्या बस रस्त्यावर धावतात काही बसेत तर एवढया काळा धूर सोडत असतात अश्या बसवर लाखोचा दुरुस्ती खर्च दाखविण्यात येते मग हा कूठे जातो. त्याचं कोणतेच ऑडीट केले जात नाही. 10 टक्के एसटीचे वाहक चालक वागणुकीला खराब आहेत. परंतू 90 टक्के चागल्या वाहक चालकाला अनंत त्रास सहन करीत नौकरी करावी लागत असते. ना ते होत असलेल्या भ्रष्टाचाराविरूध्द आवाज उठवु शकत नाही कारण त्यांचा नौकरीचा संबंध असतो. या कर्मचा-याचे भविष्य निवार्ह निधी संदर्भात तर असे दिसून आलेले आहे की कर्मचा-याचा भविष्य निर्वाह निधीची रक्कम वेळेत कार्यालयाकडे भरणा करण्यात येत नाही. एसटी आतून एवढया खराब असतात की त्या कधीच धुतल्या जात नाही, खिडक्याची

काचे तूटलेली, बरोबर न उघडणारी, गाडीच्या नावाच्या पाटया, अस्वच्छ बसस्थानक अश्या अनेक बाबीचा त्रास सहन करीत असुन सुध्दा दुसरा कोणता चांगला पर्यात नसल्यामूळे एसटीने प्रवास करावा लागत असतो. कोणत्याही नविन मार्गाचा विचार केला जात नाही कि कसे एसटीचे उत्पन्न वाढेल. आहे त्याच मार्गावर गाड्या चालविल्या जातात. यामूळे एसटी कशी फायदयात येईल.

एसटी तोटयात आहे म्हणून दरवाढ करत राहायची हे कधी थांबणार असे जर चालत राहिले तर एक वेळ एसटी मंडळामंडळ बंद करण्याची वेळ येईल. याचा विचार एसटी महामंडळाने तर करावाच सोबत सरकानेसुध्दा याबाबत गंभीर्याने दखल घ्यावी. अन्न व औषध प्रशासनाचे श्री तुकाराम मुंढे यांनी ज्यापध्दतीने आपले कार्य करीत आहे त्याच पध्दतीने कार्य करणा-या अधिका-यांची नितात गरज एसटीला आहे. किंवा एसटीसुध्दा अश्या कार्यक्षम अधिका-याची वाट पहात आहे का ?

( लेखक )
                           ( लेखक )

किशोर के. कवटे श्री शिवेश्वर नागरी सह. बँक लि. वसमत मो. 7972498468

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button