ताज्या घडामोडी
आ.राजुभैय्या नवघरे आयोजित महारक्तदान शिबीरात 1077 रक्तदात्यानी केले रक्तदान
कार्यकारी संपादक नागेश चव्हाण

वसमत विधानसभेत विक्रमी महा रक्तदान शिबीर संपन्न; तब्बल १,०७७ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
वसमत : नागेश चव्हाण
वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत उर्फ राजुभैय्या नवघरे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘महारक्तदान शिबीराला’ नागरिकांचा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक प्रतिसाद मिळाला. सप्ताहत व दिवसभरात तब्बल १,०७७ दात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा एक नवा वस्तुपाठ घालून दिला आहे.
मयुर मंगल कार्यालयात तरुणाईचा उत्साह!
कारखान रोड येथील मयुर मंगल कार्यालय येथे सकाळी ९ वाज
ल्यापासूनच रक्तदात्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. राजकीय, सामाजिक आणि युवा वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमात सहभाग नोंदवला. विशेषतः तरुण आणि महिला रक्तदात्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
रक्तदानातून सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम
आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण आणि रक्ताचा तुटवडा लक्षात घेता, आयोजित करण्यात आलेले हे शिबीर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी अत्यंत दिलासादायक ठरणार आहे.
“वसमत मतदारसंघातील जनतेने दाखवलेले हे औदार्य आणि प्रेम अभिमानास्पद आहे. १,०७७ रक्तदात्यांचे हे योगदान शेकडो गरजवंतांचे प्राण वाचवण्यासाठी मोलाचे ठरेल. सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो.” — आमदार चंद्रकांत (राजूभैय्या) नवघरे

