ताज्या घडामोडी

मौजे कुरुंदा येथे रुग्णवाहिका लोकार्पण व नारी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न!

कार्यकारी संपादक नागेश चव्हाण

मौजे कुरुंदा येथे रुग्णवाहिका लोकार्पण व नारी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न!
*स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे उद्घाटन*

कुरुंदा (नागेश चव्हाण):


वसमत तालुक्यातील मौजे कुरुंदा येथील दुर्गा माता मंदिर परिसरात आज स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘जनसेवा सप्ताह’ अंतर्गत विविध सामाजिक उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी लोकप्रिय आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या शुभहस्ते विधानसभा अध्यक्ष आशीर्वादभैय्या इंगोले यांच्यावतीने देण्यात आलेल्या *रुग्णवाहिकेचे लोकार्पण* आणि विविध कार्यक्रमांचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
सकाळी १० वाजता टोकाई माता व दुर्गा माता मंदिर परिसरात वृक्षारोपणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.


🔹 *महिला सक्षमीकरण आणि नारी सन्मान*
या जनसेवा सप्ताहाच्या माध्यमातून कुरुंदा व परिसरातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी स्वखर्चातून *१०० मोफत शिलाई मशिनचे वाटप* करण्यात आले. तसेच आरोग्य सेवेत तत्पर असणाऱ्या आरोग्य सेविका व अंगणवाडी सेविकांचा *’नारी शक्ती सन्मान’* देऊन गौरव करण्यात आला.
💬 *”आमदार राजूभैय्या नवघरे हेच माझे राजकीय गुरु” – आशीर्वादभैय्या इंगोले*
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना कार्यक्रमाचे संयोजक आशीर्वादभैय्या इंगोले म्हणाले: *”माझ्या राजकीय आयुष्यात आमदार राजूभैय्या नवघरे हे माझे आदर्श आणि मार्गदर्शक आहेत. त्यांच्याच प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली कुरुंदा व परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका तसेच महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी १०० शिलाई मशिनचे वाटप करण्याचा संकल्प मी पूर्ण करू शकलो.”*

👥 *मान्यवरांची उपस्थिती*
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंजाजीराव इंगोले हे होते.
*प्रमुख पाहुणे म्हणून:*
तानाजी भेंडे, सचिन भोसले, बाळूमामा ढोरे, जिजामामा हरणे, सतीश नरवाडे, सतीश पोले, दिलीप डाडाळे, गुलाबराव पाटील, किसन चांदणे, रघुनाथ नरवाडे, गजानन डाडाळे, कुंडलिक नरवाडे, हिरामण काचनगिरे, गौतम ढेंबरे, साहेबराव नरवाडे, मुंजाजीराव दळवी, दत्तरामजी इंगोले, चंद्रकांत दळवी, बाबूराव दळवी, अशोकराव दळवी, प्रल्हादराव इंगोले, बबनराव कदम, पांडूमामा शतलवार, बाबूराव काळे, दिलीप सोनटक्के, बबनराव सिध्देवार, रंगराव कदम, देवानंद दळवी, बालाजी दळवी, कल्याण दळवी, रवींद्र महाजन, अमोल इंगोले, गजानन दळवी, भगवान इंगोले, काशिनाथ झिळे, युवराज दळवी, रमेश दळवी, उत्तम दळवी, इब्राहिम पठाण यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👏 *lकार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम*
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी *आशीर्वादभैय्या मित्र मंडळाच्या* कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. यात अतुल दळवी, झुनाजी इंगोले, हरी दळवी, विशाल खराटे, रखमाजी इंगोले, परमेश, रियाज पठाण, फिरोज पठाण, अक्सार शेख आदींचा समावेश होता.
कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पांडे सर* यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button