दारेफळ येथे भव्य मोफत नेत्रतपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; नऊ रुग्णांवर यशस्वी मोफत शस्त्रक्रिया
वसमत प्रतिनिधी : नागेश चव्हाण

डॉ.के.सी.पारेख लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट परभणी संचलित लायन्स नेत्र रुग्णालय, परभणी आणि लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईड यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे दारेफळ (ता. वसमत) येथे भव्य मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दारेफळ येथील ज्येष्ठ समाजसेवक राजाभाऊ भालेराव आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. तसेच लायन्स नेत्र रुग्णालय, परभणी येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाला औपचारिक सुरुवात करण्यात आली.
या शिबिराचे प्रकल्पप्रमुख सी. ए. एकनाथ जगताप यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले. शिबिरामध्ये एकूण १५६ रुग्णांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान १२ रुग्णांमध्ये मोतीबिंदूचे निदान झाले. या सर्व रुग्णांना लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईडच्या वतीने पुढील उपचारांसाठी परभणी येथील लायन्स नेत्र रुग्णालयात पाठविण्यात आले.
या रुग्णांपैकी नऊ रुग्णांवर यशस्वीपणे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर सर्व रुग्णांना लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईडच्या वतीने सुरक्षितपणे घरपोच सोडण्यात आले. या सेवाभावी कार्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी लायन्स नेत्र रुग्णालयाचे लॉ. कुचेरिया सर, लॉ. मुंदडा सर, लॉ. नीरज सर, डॉ. मुळे मॅडम, डॉ. गावंडे मॅडम आणि डॉ. मोरे सर यांची विशेष उपस्थिती होती.
तसेच लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईडचे अध्यक्ष संजीवकुमार बेंडके, माजी अध्यक्ष राजू सिद्दीकी, सचिव कल्याण कुरुंदकर, कोषाध्यक्ष संदीप चव्हाण, सी. ए. एकनाथ जगताप, राजाराम जगताप, विजय लांडगु, अंबादास मनी, गौस बागवान, इम्रान नूर, प्रसाद लालपोतू, ॲड. अरुण आंबेकर, आलोक जाधव, विक्रम कुंटूरवार, बाळासाहेब बेले, मन्मथ सिद्धेवार, रोहित टेहरे, पिंटू बोखारे, योगेश चेपूरवार, अमित अवसरमल, आशीर्वाद इंगोले आणि दीपक कट्टेकर यांच्यासह रमेश भालेराव (तंटामुक्ती अध्यक्ष), गुलाबराव पाटील (पोलीस पाटील), गोपीनाथ खरवडे, गणेश वाल्हेकर, प्रवीण अग्रवाल आणि भगवानराव भालेराव (पोस्टमास्तर) यांची उपस्थिती लाभली. तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. भविष्यातही लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईडच्या वतीने विविध सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


