ताज्या घडामोडी

श्री खोलेश्वरच्या दिव्याराणीची राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

दि. २२/१०/२०२६ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, परभणी येथे पार पडलेल्या शालेय विभागीयस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या १७ वर्ष वयोगटातील
दिव्याराणी गणेश काळे हिने हातोडा फेक क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावून सिल्व्हर मेडल प्राप्त केले असून तिची राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

यापूर्वी तिने तालुका, जिल्हा व विभाग स्तरावर कठीण परिश्रम व सातत्यपूर्ण सराव करून हे यश मिळवले आहे.

या यशस्वी विद्यार्थिनीला विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सतीश बलुतकर व क्रीडा शिक्षिका भाग्यश्री खोसे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

या यशस्वी खेळाडूचे,मार्गदर्शक शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र अलूरकर, कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य,संस्थेचे सहकार्यवाह अमरनाथ खुर्पे,मुख्य प्रशासकीय समन्वयक प्रा. चंद्रकांत मुळे,स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल देशपांडे,कार्यवाह किरण कोदरकर, शालेय समिती अध्यक्ष अविनाश मुडेगावकर,मुख्याध्यापक अनंतराम कोपले,उपमुख्याध्यापक संदीप देशमुख,पर्यवेक्षक सूर्यकांत उजगरे,पर्यवेक्षिका प्रेमल खंडागळे, अभ्यासपूरक मंडळ प्रमुख श्रीकांत देशपांडे,ज्योती शिंदे व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button