ताज्या घडामोडी

श्री सिद्धेश्वर विद्यालय वसमत येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न.

कार्यकारी संपादक - नागेश चव्हाण

वसमत- सिद्धेश्वर विद्यालय वसमत येथे क्रीडा व युवक सेवा संचालनाय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला…. विद्यार्थ्यांनी कबड्डी क्रीडा स्पर्धेत आपले कौशल्य दाखवत उत्कृष्ट कामगिरी बजावली… स्पर्धेदरम्यान खेळाडूंमध्ये उत्साह खेळाडू वृत्ती आणि सांघिक भावना दिसून आली. विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देणे त्यांच्यातील सुप्त क्रीडा गुणांना वाव देणे तसेच शारीरिक आणि मानसिक विकास साधने हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता… या सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सारंग स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी संचलित संस्थेचे अध्यक्ष श्री अशोकरावजी सावरगावकर साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी श्री आत्माराम बोथीकर साहेब हे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री सिद्धेश्वर विद्यालय वसमत येथील मुख्याध्यापक श्री कांबळे टी.जी. पर्यवेक्षक श्री रेड्डी एस. बी, तसेच डॉक्टर शिवशंकर कापसे, मा. प्राध्यापक श्री निवृत्ती बांगर सर, क्रीडा शिक्षक अडकिने सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले… या स्पर्धे मुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button