ताज्या घडामोडी

कोरडा दुष्काळाचा सामना करण्यासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज

कार्यकारी संपादक :- ( संजीव कुमार बेंडके)

छत्रपती संभाजी नगर/
आजच्या तापमानाची परिस्थिती पाहता आगामी काळात मराठवाड्यात दुष्काळाचे दुष्परिणाम हे येत्या काळात अधिक गंभीर होण्याची आज तरी परिस्थिती आहे संपूर्ण मराठवाड्याचा विचार केल्यास मराठवाड्यात जवळपास सर्व ठिकाणी शेती हा मुख्य व्यवसाय आहे तसेच शेतीपूरक असणारी सर्व व्यवसाय पाण्याअभावी पुढील काळात अडचणीत येण्याची दाट शक्यता दिसते काही भागात हळदीचे पीक आज जरी तग धरून उभे असले तरी येत्या काळात अशीच परिस्थिती राहिल्यास उत्पन्न मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे तसेच नगदी पीक समजणारे ऊस अशा सारखी पिके उतारा न आल्यास संपूर्ण मराठवाड्यात शेती ही तोट्याची राहणार आहे. दुष्काळ परिस्थितीमध्ये पिण्याचे पाण्याची नियोजन व जनावरांचा चारा यासाठी शासन सोबतच सामाजिक संघटना, सेवाभावी संस्था यांनी आतापासूनच पुढाकार घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे

उपयोजना
दुष्काळ असेपर्यंत संपूर्ण नवीन बांधकाम स्थगिती देण्यात यावी.
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी व राहण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी एकत्र येऊन मदत करण्याची गरज.

सध्या कार्यरत असणाऱ्या व चांगली काम करणाऱ्या गोशाळांना अधिकची मदत दिल्यास त्यांना व्यवस्थापन करणे सोयीस्कर होऊ शकते.

या निर्माण झालेल्या आपत्तीमधील समाजातील सर्व घटकांनी येऊन एकोप्याने या निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना केल्यास निश्चितच सर्वांनाच फायदा होऊ शकेल.

पत्रकारांनी या निर्माण झालेल्या दुष्काळ परिस्थितीमध्ये समाजात जनजागृती करणे तसेच सेवाभावी संस्थांना एकत्रित आणणे दुष्काळावर उपाय योजना करण्यासाठी प्रशासनासोबत संवाद साधत समाजाला या परिस्थितीमधून कसा दिलासा देता येईल याची काम करावे लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button