ताज्या घडामोडी

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे संकल्प पूजन संपन्न

कार्यकारी संपादक :- नागेश चव्हाण

( अमृत महोत्स( अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष प्रकल्प समितीचा उपक्रम)

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून दि.१७ सप्टेंबर २०२६ गुरुवार रोजी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या अमृत महोत्सवा निमित्त स्थापन करण्यात आलेल्या विशेष प्रकल्प समितीच्या वतीने मांडवा रोड स्थित १२ एकर जागेत सरदार
वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे संकल्प पूजन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र अलुरकर,कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य, रा.स्व.संघाचे तालुका संघचालक निवृत्ती दराडे,सहकार्यवाह अमरनाथ खुर्पे,केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश तळणीकर,उमेश जगताप,राम कुलकर्णी, वर्षाताई मुंडे,विष्णू सोनवणे,नितीन चौधरी,मुख्य प्रशासकीय समन्वयक तथा प्राचार्य प्रा.चंद्रकांत मुळे, श्री.खोलेश्वर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष डॉ.अतुल देशपांडे,कार्यवाह किरण कोदरकर,
माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष अविनाश मुडेगावकर,लोकमान्य टिळक विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष अप्पाराव यादव, इंजि.दिनेश पुरी आदी उपस्थित होते.
प्रारंभी विशेष प्रकल्प समितीचे सदस्य तथा स्थानिक कार्यवाह किरण कोदरकर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली.मराठवाडा मुक्ती संग्रामात सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान असून त्याची जागृती पिढ्यानपिढ्या राहावी,यासाठी या पुतळ्याच्या संकल्प पूजनाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी मार्गदर्शन करताना संस्थेचे कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य म्हणाले की, ‘मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी स्वामी रामानंद तीर्थ व सर्व क्रांतिकारकांच्या प्रयत्नांना यश देण्याचे काम ‘ऑपरेशन पोलो’ या पोलीस कारवाईच्या माध्यमातून सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले.हा इतिहास आगामी पिढ्यांना कळावा, यासाठी समाज,शासन व भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून हा संकल्प पुतळा उभा करण्याचे कार्य, तसेच प्रशिक्षण केंद्र आणि मराठवाड्याच्या इतिहासाचे भव्य-दिव्य इतिहास जागृती दालन उभारण्याचा संकल्प आपण केला आहे.शासन,समाज व संस्थेच्या प्रयत्नातून हा संकल्प आपण पूर्ण करूया’.

यानंतर विधिवत पूजा करून उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभाचा संकल्प करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकताच जाहीर झालेला संस्कृत कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रा.डॉ.दिगंबर मुडेगावकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी खोलेश्वर शैक्षणिक संकुलातील सर्व संस्कार केंद्रप्रमुख आणि शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.वी वर्षानिमित्त विशेष प्रकल्प समितीचा उपक्रम)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button