एम.आय.टी कॉलेज, वसमत येथे विद्यापीठाचा 78 वा पदवी दान समारंभ उत्साहात संपन्न
कार्यकारी संपादक :- नागेश चव्हाण

वसमत, दि. 16 सप्टेंबर 2026: युवक प्रतिष्ठान, वसमत संचलित एमआयटी कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स, वसमत (जि. हिंगोली) (बी. सी. ए. व बी. सी. एस.) येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या विद्यापीठ प्रोटोकॉलनुसार 28 वा पदवी प्रमाणपत्र वितरण (Convocation Ceremony) समारंभ मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला.
समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील डेप्युटी रजिस्ट्रार डॉ. रवी सरोदे सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ शंकरराव कल्याण सर होते. यावेळी युवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. इंद्रजीत काळे सर व सचिव सौ. वैशाली काळे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, विद्यापीठ गीत व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर विद्यापीठाच्या प्रोटोकॉलनुसार पदवीधारक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली तसेच पदवीधारकांनी विद्यापीठाची शपथही घेतली. या कार्यक्रमाच्या प्रसंगी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले त्यामध्ये कु. मीरा शिंदे, अंकीता क्षत्रिय, खुशी वेडे, धनंजय कदम, स्नेहा भोसले यांनी मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयात शिक्षण घेतानाच्या आठवणीना उजाळा करून दिला.
प्रमुख पाहुणे डॉ. रवी सरोदे यांनी विद्यार्थ्यांना पदवी ही केवळ प्रमाणपत्र नसून जबाबदारी आणि समाजसेवेची नवी सुरुवात असल्याचे सांगत उच्च शिक्षण, संशोधन, कृत्रिम बुद्धिमता आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले व आपले सामाजिक जीवनात आई वडिलांची सेवा करण्याचा संदेश दिला.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. कल्याण गुरुनाथ शंकरराव यांनी पदवीधारक विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून प्रामाणिकपणा, कौशल्य आणि सामाजिक बांधिलकी यांच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडविण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाला पदवी धारक विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. याप्रसंगी बी. सी. ए. व बी. सी. एस. पदवीधारक विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करताना आजचे प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष संस्थेचे सचिव व तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या हस्ते पदवीधारक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन नॅक समन्वय समितीच्या प्रमुख प्रा. नीता जाधव मॅडम यांनी केले, तर प्रास्ताविक महाविद्यालयाचे अधीक्षक अॅड. जगन जामगे सर यांनी केले व प्रमुख पाहुण्याचा परिचय प्रा. अश्विनी टाक मॅडम यांनी दिला. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. मनोज कांबळे सांस्कृतिक विभाग प्रमुख यांनी सर्वांचे आभार मानले.
महाविद्यालयाच्या संस्कृती विभागाच्या वतीने आयोजित या समारंभास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



