ताज्या घडामोडी

बोधानंद मठामध्ये टाळ सप्ताहाची सांगता

वसमत / विशेष प्रतिनिधी -

शहरातील ब्राह्मण गल्लीतील श्री बोधानंद स्वामी मठामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी अखंड टाळ सप्ताहाची सांगता गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात संपत्र झाला संपूर्ण वसमत तालुक्याचे ग्रामदैवत असलेल्या या या मठात अनेक भाविकांची श्रद्धा आहे हिंगोली जिल्हा सह महाराष्ट्राच्या अनेक भागातून भाविक या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या पालखी कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित राहतात अशी माहिती रमेश गुरु बडवणे यांनी टाइम्स ऑफ मराठवाडा, न्यूज पोर्टल प्रतिनिधी. समवेत बोलताना दिली.

* पालखीचे आयोजन – बोधानंद स्वामी यांची पालखी शहरातील मठापासून निधून ती शहराच्या सर्व मुख्य रस्त्याहून संपूर्ण शहरांमध्ये मिरवणूक काढली जाते यावेळी शहरातील सर्व रस्त्यांवर रांगोळी व फुले याची सजावट केली जाते.

:- अनेक मान्यवरांची उपस्थिती -:
या पालखी सर्व समाजातील भाविक मोठ्या श्रद्धेने व आनंदांने हा सोहळा साजरा करतात अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थितीत असते.

टाळ सप्ताहाच्या निमित्ताने शहरात भक्क्तिामय वातावरण निर्माण झाले होते. अखंड नामस्मरण, भजन-कीर्तन, टाळ-चिपळ्यांच्या गजरात मठ परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला. अशा धार्मिक परंपरा जपल्या गेल्याने समाजात एकता, श्रद्धा व भक्तिभाव वृद्धिंगत होतो, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button