वसमत : श्री बोधानंद गणेश मंडळ, ब्राह्मण गल्ली, वसमत यांच्या वतीने आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनासह मंडळाच्या विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना अधिक गतिमान करण्याच्या उद्देशाने नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी श्री बोधानंद गणेश मंडळाच्या बैठकीत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. मंडळाच्या आगामी गणेशोत्सवाचे नियोजन, विविध उपक्रमांचे आयोजन तसेच मंडळाच्या पुढील वाटचालीबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी श्री बोधानंद गणेश मंडळ कार्यकारिणी मंडळ – २०२६ ची निवड पुढीलप्रमाणे करण्यात आली.
श्री बोधानंद गणेश मंडळ कार्यकारिणी मंडळ – २०२६
अध्यक्ष : श्री राजू दुर्गादास पत्की
उपाध्यक्ष : श्री नितीन तुकारामपंत अंबेकर
कोषाध्यक्ष : श्री अमित अशोकराव देशपांडे
सचिव : श्री आनंद बाबुराव औसेकर
सहसचिव : श्री धनंजय किशनराव मडके
सांस्कृतिक सल्लागार : श्री लक्ष्मीकांत धानोरेकर
सदस्य :
श्री सुयश कात्नेश्वरकर
श्री आनंद बडवणे
श्री रघोत्तम पांडे
श्री रामभाऊ पाच्छे
श्री विनोद कुरुंदकर
श्री अनिल पांडे
नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून आगामी गणेशोत्सव उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि सामाजिक एकोप्याच्या भावनेने साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच मंडळाच्या आगामी धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना सर्व गणेशभक्त, सभासद व कार्यकत्यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. नूतन कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली श्री बोधानंद गणेश मंडळाची पुढील वाटचाल अधिक प्रभावी व समाजोपयोगी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



