ताज्या घडामोडी

श्री बोधानंद गणेश मंडळातर्फे आरोग्य व सवलतीच्या कार्डांचे शिबिर संपन्न..

कार्यकारी संपादक :- नागेश चव्हाण

१६० नागरिकांनी घेतला आयुष्मान भारत योजनेचा लाभ; दीडशे नागरिकांनी एनसीएमसी कार्ड काढले

वसमत : श्री बोधानंद गणेश मंडळ, ब्राह्मण गल्ली, वसमत यांच्या वतीने आज शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या उपक्रमामध्ये आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड, आभा हेल्थ आयडी कार्ड तसेच ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी वय वंदना योजनेअंतर्गत कार्ड काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या आरोग्यविषयक शिबिराचा जवळपास १६० नागरिकांनी लाभ घेतला.

तसेच MSRTC, Ebixcash व NSDL यांचे NCMC कार्ड काढून देण्यासाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली होती. या सुविधेअंतर्गत प्रवासातील सवलतीसाठी आवश्यक कार्डांचा जवळपास १५० नागरिकांनी लाभ घेतला.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी MPW प्रसनजीत दातार आणि सौ.मनीषा शिवचंद्र पत्रकर यांनी बोधानंद गणेश मंडळाला मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळवून देणे शक्य झाले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष राजू पत्की, कोषाध्यक्ष धनंजय मडके, उपाध्यक्ष नितीन अंबेकर, सचिव आनंद औसेकर तसेच मंडळाचे सर्व युवा कार्यकर्ते व सदस्य यांनी परिश्रम घेतले. या संपूर्ण उपक्रमासाठी आनंद बडवणे यांचे मार्गदर्शन लाभले.

श्री बोधानंद गणेश मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमामुळे नागरिकांना शासकीय आरोग्य योजना व प्रवास सवलतीच्या सुविधांचा लाभ सहज उपलब्ध झाला. त्यामुळे नागरिकांनी मंडळाच्या या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button