
वसमत (जिल्हा -हिंगोली)
मराठवाड्यातील भीषण पाणी फटका आता शेतकऱ्यांना प्रत्यक्षरीत्या बसताना दिसत असून शेतातील मराठवाड्यामध्ये मूल्यवान समजल्या जाणाऱ्या हळद पीक वाचण्यासाठी शेतकरी अक्षरशः आता टँकरचा आधार घेत असल्याची चित्र पहावयास मिळत आहे.
अगोदरच शेतीमध्ये होणारा प्रचंड उत्पादन खर्च व मजूरटंचाई यामध्ये यावर्षी पावसाने दडी मारल्याने शेतकरी अक्षरशः मेतकोटीस आल्याचे सर्वत्र दिसत आहे
शाश्वत उत्पन्न नसल्यामुळे समाजातील सर्व घटक दिवाळी जोरात साजरी करीत असताना शेतकरी मात्र हवाल दिल परिस्थितीमध्ये कशीबशी दिवाळी साजरी करताना दिसून येत आहे



