
वसमत -(जि.हिंगोली) – वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शंकरराव खराटे यांचे आज निधन झाले.त्यांचा अंत्यविधी
दिनांक -१४/११/२०२६ रोज -शनिवार,सकाळी -१० वाजता.त्यांचे मूळ गाव -कोठा ता.वसमत येथे करण्यात येणार आहे.शंकरराव खराटे यांचे वसमत तालुक्यात
सहकार क्षेत्रात मोठे योगदान होते.अत्यंत परिश्रम घेउन त्यांनी टोकाई सहकारी साखर कारखान्यांची उभारणी केली.तसेच त्यांनी शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातुन
शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केली.



