हिंगोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी जिल्ह्यामध्ये अनुकूल जागा असेल तिथे एखाद्या मोठ्या उद्योगाची स्थापना होण्याची आवश्यकता आहे शासन स्तरावर याची दखल घेऊन मोठा उद्योग स्थापन करण्याची मागणी मराठवाडा जनता विकास परिषद, छत्रपती संभाजी नगर. चे सदस्य तथा रेल्वे प्रश्नांचे अभ्यासक श्री किशोर कवठे यांनी केली आहे.
*मोठ्या उद्योगाची आवश्यकता:-हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकेल तसेच जिल्ह्याचे विकासाला यामुळे मोठे बळ मिळणार आहे.
*जागेची उपलब्धता:-हिंगोली जिल्ह्यात मोठा उद्योग आल्यास त्यासाठी लागणारी जागा उपलब्ध मोठ्या प्रमाणावर आहे तसेच उद्योगाला लागणारे प्राथमिक सुविधा या पण उपलब्ध होऊ शकतात.
*जिल्ह्यामध्ये कुशल कामगाराची उपलब्ध आहे:-तसेच उद्योगाची उभारणी झाल्यास मोठ्या शहरात कामगाराची स्थलांतर कमी होणार व स्थानिकांनाही याचा फायदा होईल.
*राज्य शासनाने लक्ष घालण्याची गरज:-यामध्ये जिल्ह्यातील प्रश्नाकडे राज्य शासनाने लक्ष घातल्यास मोठा उद्योग स्थापन होण्यास मदत होणार आहे.



