शिवेश्वर बँकेतर्फे सभासदांना 10% लाभांश जाहीर.
(टाइम्स ऑफ मराठवाडा ब्यूरो) वसमत. (जि. हिंगोली

श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक लिमिटेड वसमतची 31 वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष शिवदास बोडेवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी साडेअकरा वाजता संपन्न झाली. यावेळी सभासदांना 10 टक्के लाभांश जाहीर करण्यात आल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष शिवदास बोडेवार यांनी दिली.
* आर्थिक वर्ष 2025-26 या वर्षींसाठी बँकेचे 31 वी वार्षिक सर्व साधारण सभा बँकेचे मुख्य कार्यालय वसमत येथे संपन्न झाली यावेळी 31 मार्च 2026 अखेर बँकेचे वसूल भाग भांडवल आठ कोटी 05 लाख 64 हजार, 350, राखीव व इतर निधी 19 कोटी 22 लाख 06 हजार 909 रुपये 96 पैसे तर बँकेच्या एकूण ठेवी 194 कोटी 45 लाख 20 हजार एवढ्या झाल्या आहेत बँकेचे एकूण गुंतवणूक 69 कोटी 32 लाख 14 हजार 152 रुपये तर बँकेचे एकूण कर्जवाटप 117 कोटी 82 लाख 81 हजार 135 रुपये 29 पैसे झाले आहेत तर एकूण नफा 01 कोटी 71 लाख 12 हजार 259 पॉईट 67 झाला आहे.
* सन 2025-26 साठी सभासदांना 10% टक्के लाभांश यावेळी जाहीर करण्यात आला सभासदांनी या निर्णयांचे स्वागत केले.
* सदरील सभेसाठी बँकेचे उपाध्यक्ष भारत नामपल्ली, संचालक विनोद झंवर, दत्तात्रय दलाल, नागनाथराव कोंपलवार, बालासाहेब जाधव, लक्ष्मीकांत कोसलगे, शेख मैनुगीन संदलजी, नारायण लासिनकर, वसंत चेपूरवार, बालाजी माळवतकर डॉक्टर धोंडीराम पाडर्डीकर, श्रीमती शकुंतलाबाई देवणे, सौ रुपाली दगडू , एडवोकेट दीपक कट्टेकर, रमाकांत भागानागर, अॅड बाघीले आदींची उपस्थिती होती
यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक कल्याणकर व सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर कवटे, किशन पानंधोंडे, संजीव बेंडके, रघुत्तम पांडे, पवन खंडारे, मुळे दत्तात्रय, शिवानंद सोनटक्के, गणेश गरुड, ताजपाशा पठाण, यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



