विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचारातून आपले भविष्य घडवावे माजी सहकारमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांचे प्रतिपादन
(टाइम्स ऑफ मराठवाडा ब्युरो) वसमत-
विद्यार्थी हा देशाचा आधारस्तंभ असुन विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण ही महाविद्यालयातून होत असते. त्यासाठी शिक्षकांचे संस्कार हे अत्यंत महत्त्वाचे असतात.
प्रामाणिक कष्ट आणि सकारात्मक विचाराच्या जोरावर विद्यार्थ्यानी आपले आयुष्य घडवावे, असे प्रविपादन माजी सहकारमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी केले. ते वसमत येथील श्री योगानंद स्वामी कला महाविद्यालयाच्यावतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलत होते. याप्रसंगीं मंचावर सौ. रीतादेवी मुंदडा, संस्थेचे सहसचिव श्री. राजेश दिगंबरराव मंचोवार, श्री. संजय कुबडे, प्राचार्य डॉ. नागनाथ पाटील आदींची प्रमुख उपस्थिती.
* याप्रसंगी पुढे बोलताना डॉ. मुंदडा म्हणाले की, माणसाच्या आयुष्यात अडथळे येत असतात त्यावर आपण प्रयत्नपूर्वक मात करुन यश मिळवले पाहिजे. जीवनात कोणतीच गोष्ट अशक्य नसते, ती प्रापत करण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. आज ग्रामीण भागातील व प्रतिकूल परिस्थितीतील विद्यार्थीही अभ्यास व सकारात्मकतेच्या जोरावर यशाच्या शिखरावर जात आहेत हा आदर्श सर्वानी घेतला पाहिजे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. डॉ मुंदडा यांचा वाढदिवस एक परिवार वृद्धाश्रम, फळसगाव येथे शाल वाटप, वृक्षारोपण, विद्यार्थिनींना मोफत पास व विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप अशा विधायक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
*कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्वाविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नागनाथ पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वमलाकर चव्हाण यांनी तर आभार डॉ. ज्ञानेश्वर गाडे यांनी मानले.
या कार्यक्रमास अनुजा सोमाणी, सौ. शारदा मुंदडा, मुंजाजीराव इंगोले, संभाजी बेले, डॉ. धोंडीराम पार्डीकर, श्याम पांडे, दीपक मुंदडा, माजी नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार, माजी सभापती अंकुश आहेर, माजी सभापती रामकिशन झुंझुलडे, नगरसेवक राजेश पवार, रत्नाकर अडसिंरे, काशीनाथ भोसले, तानाजी कदम, गणेश काळे, अतुल गोरे, चंद्रकांत चहाड, विनोद मजननवार तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



